Monday, July 30, 2007

मी माझा?

मी माझा?

इथे वेडे असण्याचे
खूप फायदे आहेत
शहाण्यांसाठी जगण्याचे
काटेकोर कायदे आहेत।

-

इथे स्मगलिंग करण्याचे
खूप फायदे आहेत।
वडापाव विकणाऱ्यांसाठी
काटेकोर कायदे आहेत।

आता मलाही लागलय जमायला
तुझ्यासारखं वागणं
समोर आलीस की गप्प रहाणं
रात्री कुढत जागणं



आता मलाही लागलय जमायला
तुझ्यासारखं वागणं
बिल समोर आलं की
हात धुवायला जाणं


तु विझत असताना तुझ्याभोवती
मी ओंजळ धरली
तू तेवत राहिलास नी प्रकाशाने
माझी ओंजळ भरली


शेंगदाणे खाताना तू
मी तुझ्यासमोर ओंजळ धरली।
तू तर खातच राहिलास, नी फोलपटांनी
माझी ओंजळ भरली


माझ्या प्रत्येक क्षणात
तुझा वाटा अर्धा आहे।
भूतकाळ आठवायचा तर
तुझ्याच आठवणींची स्पर्धा आहे


माझ्या प्रत्येक बिलात
तुझा वाटा अर्धा आहे,
पण भरायची वेळ आली,
की पळून जाण्याची स्पर्धा आहे।


ज्या गोष्टींची भीती होती
तेथ होऊन बसलंय
तुझ्याकडे पाठवत नाही म्हणून
माझं मन माझ्यावर रुसलय


ज्या गोष्टीची भीती होती
तेथ होऊन बसलंय।
बायकोच्या मैत्रिणीवरच
माझ मन बसलंय

एकदा मला ना तू
माझी वाट पाहाताना पहायचंय
तेवढ्यासाठी आडोशाला
हळूच लपून रहायचंय

कधीतरी मला तुला
गप्प बसलेलं पहायचंय
बाकी कधी शक्‍य नाही, म्हणून
जेवताना जवळ रहायचंय

आम्ही झोलकर झोलकर..

झोलकर...

आम्ही झोलकर झोलकर...
झोलकर ब्लॉगचा राजा
या ब्लॉगवरी कायम लिहित जाना...
या ब्लॉगची रित आहे न्यारी
त्याला चढवा तुम्ही खुमारी
अनेक लिंक्‍समधून
स्वत:ला एक्‍स्प्रेस करा ना...